Ad will apear here
Next
मत्स्यसंवर्धनाच्या शाश्वत विकासातील आव्हानांचा वेध घेणारी आंतरराष्ट्रीय परिषद रत्नागिरीत सुरू


रत्नागिरी :
‘शाश्वत मासेमारी आणि मत्स्य संवर्धन विकास : आव्हाने आणि संधी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला रत्नागिरीतील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयात १७ जानेवारी २०१९ रोजी सुरुवात झाली. २० जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत मत्स्य शाखेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

नवी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (मत्स्य आणि प्राणी) डॉ. जे के जेना, डॉ. जे. जयललिता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. फेलिक्स, मुंबईच्या केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेचे संचालक तथा कुलगुरू डॉ. गोपाळकृष्ण, याच संस्थेचे माजी कुलगुरू डॉ. एस डी. त्रिपाठी, दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, याच विद्यापीठाचे विद्यमान संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर आणि विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. हुकुम सिंग धाकर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन होऊन परिषदेची सुरुवात झाली. 

दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शिरगावमध्ये कार्यरत असलेले मत्स्य महाविद्यालय आणि दापोलीतील इंटरडिसिप्लिनरी सोसायटी फॉर अॅग्रिकल्चरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

मत्स्य जीवशास्त्र आणि मत्स्य व्यवस्थापन, पर्यावरण आणि जैवविविधता, मत्स्य व्यवसाय प्रशासन आणि धोरण, मत्स्यबीज उत्पादन प्रणालीतील प्रगती, माशांचे पोषण आणि खाद्यपद्धती, शाश्वत उत्पादन प्रणाली, आरोग्य व पर्यावरण व्यवस्थापन, काढणीपश्चात तंत्रज्ञानातील प्रगती, मत्स्य पदार्थ प्रक्रिया तंत्रज्ञानातील नवनवीन कल, मत्स्य अर्थशास्त्र व जागतिक व्यापार, मत्स्य विस्तार व क्षमता विकास, त्याचप्रमाणे मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्य उद्योजक यांच्याकरिता स्वतंत्र चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. 

ऑस्ट्रेलिया, स्पेन, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम या देशातील मत्स्य शास्त्रज्ञांबरोबरच भारतातील नामवंत संस्थांचे मत्स्य शास्त्रज्ञ, मत्स्य संवर्धक, मत्स्य उद्योजक आणि मच्छिमार या परिषदेत आपल्या विचारांचे आदान-प्रदान करणार आहेत. 

या परिषदेच्या पहिल्या विशेष व्याख्यानांच्या सत्रात ऑस्ट्रेलियातील जागतिक बँक व अन्न आणि कृषी संस्थेचे आंतरराष्ट्रीय मत्स्यतज्ज्ञ मार्टिन संथा कुमार यांनी ‘शाश्वत मासेमारी आणि मत्स्य संवर्धनाचे अन्नसुरक्षा आणि पोषणात महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. जे. के. जेना यांनी ‘मत्स्य संवर्धनातील आनंद, स्वास्थ्य आणि आशा’ या विषयावर, डॉ. एस. फेलिक्स यांनी ‘मत्स्य संवर्धनात प्रगतीची आवश्यकता’ या विषयावर, तर डॉ. गोपाळकृष्ण यांनी ‘मत्स्यशास्त्रातील उच्च शिक्षण’ या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. एस डी. त्रिपाठी यांनी भूषविले, तर ला वीन उपाध्यक्षपदी होते. सत्र संकलक म्हणून डॉ. नितीन गोखले व डॉ. केतन कुमार चौधरी यांनी, तर या सत्राचे समन्वयक म्हणून डॉ. मंगेश शिरधनकर यांनी काम पाहिले. 



या वेळी नवी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी सहायक संचालक डॉ. व्ही. व्ही. सुगूनन, व्हिएतनामच्या मत्स्यसंवर्धन आणि मत्स्यव्यवसायाच्या शाश्वत आंतरराष्ट्रीय सहयोगी केंद्राचे संचालक डॉ. ले थान लू, राष्ट्रीय मत्स्य जनुक संसाधन संस्थेचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. सुधीर रायजादा, थायलंड येथील ‘एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे डॉ. अमररत्ने याकूपितियागे, थायलंडच्या प्रिन्स ऑफ सोंगकाला विद्यापीठाचे डॉ. सुटावर बेंजाकूल, मुंबईच्या केंद्रीय मात्स्यिकी शिक्षण संस्थेचे माजी संचालक दिलीप कुमार, दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक सतीश नारखेडे, डॉ. जी. बी. पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल शर्मा, मत्स्य जननशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. अपर्णा चौधरी, डॉ. जितेंद्रकुमार सुंदर, डॉ. एस. एम. शिवप्रकाश, मंगलोरच्या मत्स्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद मूर्ती, म्यानमार फिशरीज फेडरेशनचे सल्लागार ला वीन, गोवा खारफुटी प्रकल्पाचे मुख्य तांत्रिक सल्लागार डॉ. अरविंद उंटावळे, सागरी संवर्धन शास्त्रज्ञ डॉ. सारंग कुलकर्णी, नैनितालच्या शीत जल मत्स्य संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. ए. के सिंग, रत्नागिरीच्या मत्स्य महाविद्यालया चे माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. शेखर कोवळे, स्पेनमधील संशोधन प्रमुख डॉ. सदाशिव जे. कौशिक, उदयपूरच्या शोभिवंत मत्स्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक डॉ. अतुल कुमार जैन, ग्रोवेल फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे विक्री आणि विपणन विभागाचे उपाध्यक्ष संदीप अहिरराव, राष्ट्रीय जल प्राणी आरोग्य संस्थेचे समन्वयक डॉ. आय. एस. ब्राइट सिंग, कोचीनच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजी या संस्थेचे संचालक रविशंकर सी. एन., थायलंडच्या प्रिन्स ऑफ सोंगाकाला विद्यापीठाचे थुमान्नुन प्रोदप्राण व गुजरातमधील वेरावळ येथील निशिंदो फूडचे दीपक चौधरी, नवी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक (सागरी मत्स्य व्यवसाय) डॉ. पी. प्रवीण, मुंबईच्या फिशरीज सर्व्हे ऑफ इंडिया संस्थेचे महासंचालक डॉ. एल. रामलिंगम, ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या प्रधान शास्त्रज्ञ डॉ. सेली थामस, नवी दिल्लीच्या इंडियन स्टेवर्डशिप कौन्सिलचे डॉ. रजित सुसिलन, मंगलोरच्या मत्स्य महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. शिवकुमार मागदा, बडोदा येथील दीपक नायट्राइट लिमिटेडचे विजय देशपांडे, रत्नागिरीच्या मत्स्य महाविद्यालयाचे माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. पी. जोशी, रामदास संधे, डॉ. एस. जी.  राजे, पंडित चव्हाण, हसन मसलाई व संयोजन समिती सचिव डॉ. आशिष मोहिते यांच्यासह, मत्स्य शास्त्रज्ञ, मच्छिमार बांधव, मत्स्य उद्योजक व मत्स्य संवर्धक उपस्थित होते. 

या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZOJBW
Similar Posts
मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक संशोधनाची चर्चा रत्नागिरी : ‘शाश्वत मासेमारी आणि मत्स्य संवर्धन विकास : आव्हाने आणि संधी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद रत्नागिरीतील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयात सध्या सुरू आहे. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी (१८ जानेवारी २०१९) सकाळी शाश्वत उत्पादन प्रणालीसह विविध विषयांवरील चर्चासत्रे पार पडली. दापोलीच्या डॉ.
‘मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनात ठसा उमटवावा’ रत्नागिरी : ‘मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मत्स्यउद्योगामध्ये मोठे योगदान दिले आहे. ३९ वर्षे या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विविध निर्यात कंपनी, मत्स्यसंवर्धन आदी क्षेत्रांत कार्यरत आहेत. आता मत्स्य संवर्धनाबरोबरच मत्स्यबीज विक्री, प्रोबायोटिक्स विक्री, औषध विक्री आदी कंपन्यांमध्ये
रत्नागिरीच्या मत्स्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद रत्नागिरी : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेले रत्नागिरीतील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय व दापोलीतील इंटर डिसिप्लीनरी सोसायटी फॉर अॅग्रीकल्चर सायन्सेस अॅंड टेक्नॉलॉजी (ISASaT) यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्य महाविद्यालयात ‘शाश्वत मासेमारी आणि मत्स्य संवर्धन विकास :
‘मत्स्य’च्या विद्यार्थ्यांना कोकण कृषी विद्यापीठाच्याच पदव्या मुंबई : महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९८३ आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम १९९८च्या कलम नऊमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ही बैठक चार जून २०१९ला झाली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language